Shri Mahalaxmi Co-Op Bank Ltd. Kolhapur providing Core Banking facility.

Useful Links

Home » Useful Links

आपल्या ग्राहकांना जाणा(KYC)

भारतीय रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने कोण्त्याही ग्राहकाचे खाते उघडण्यासाठी त्यांचेविषयी पूर्ण माहिती घेणे आणि जरुर ते सर्व दाखले घेणे बंधनकारक केले आहे. म्हणुन सर्व ग्राहक / सभासदांनी जरुर त्या कागदपत्रांची पुर्तता करुन सहकार्य करावे

कागदपत्रे

१) रेशनकार्ड २) रहिवासी दाखला ३) आयडेंटिटी कार्ड्साईज फोटो ४) पॅन कार्ड / ड्रायव्हिंग लायसेन्स / निवडणुक ओळखपत्र या पैकी एक, ५) चालु खाते उघडताना - व्यवसायाचा परवाना ( सेल्स टॅक्स / व्हॅट चा नोंदणी दाखला )

महत्वाच्या सुचना

  1. आपले चेकबुक नेहमी सुरक्षित जागी ठेवा. कधीही कोर्‍या चेक्सवर सह्या करुन ठेवु नका.
  2. आपले ए.टी.एम. /क्रेडीट कार्ड व त्याचा पासवर्ड एकत्र ठेवु नका शक्यतो लक्ष्यात ठेवा.
  3. एस.एम.एस. बॅंकींग अंतर्गत सुरु असलेल्या PULL मेसेज सर्व्हिससाठी ९२२३१७१५१५ या क्रमांकावर
    1. बॅलन्ससाठी (SBAL) (Account Type) (Account No)
    2. मिनिस्टेटमेंटसाठी (LST3) (Account Type) (Account No)
    3. चेक स्टेटससाठी (FCHQ) (Cheque No) (Account Type) (Account No) असा एस.एम.एस. करा त्याद्वारे आपल्याला माहिती मिळु शकते.सदर सेवे साठी आपला मोबाईल नंबर बॅंकेकडे रजिस्टर्ड करावा.

भारतीय रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने बॅंकिंग रेग्युलेशन कायद्याच्या कलम २४ अ अन्वये प्राप्त अधिकारात " द डिपॉझिटर एज्यकेशन ऍड अवेअरनेस फंड योजना २०१४ " जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत १० वर्षे व त्यावरील व्यवहार नसलेल्या विविध खात्यांवरील जमा रक्कम दि. ३०/०६/२०१४ रोजी या फंडाकडे पाठविण्यात आलेले आहेत.तसेच यापुढेही दरमहा या योजनेअंतर्गत १० वर्षे व्यवहार नसलेल्या खात्यांवरील जमा रक्कम रिझर्व बॅंकेकडे वर्ग होणार आहे.जे ठेवीदार अशी रक्कम परत घेऊ इच्छितात त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज व के.वाय.सी. बाबत पुर्तता करुन त्या त्या शाखेतील शाखाधिकारी यांचेशी संपर्क साधावा. सर्व खातेदारांनी आपले खाते ऑपरेटिव्ह राहणेसाठी खातेवर व्यवाहार करावेत.

प्राप्तीकर कायदा १९६० कलम १९४ - अ नुसार मुदतठेवीवरील व्याज रु. १०,०००/- व त्यापेक्षा जास्त देय झाल्यास त्यातुन टी.डी.एस. कपात केली जाते. कोणत्याही सहकारी संस्थेच्या सभासदांना त्यांच्या ठेवीवर मिळणार्‍या व्याजास टी.डी.एस. कपात न करणेबाबत सवलत देणेत आली आहे. तथापि वैयक्तिक आयकर विवरण पत्रात सदरचे उत्पन्न दाखविणे हि ठेवीदाराची वैयक्तिक जवाबदारी आहे.

खर्‍या नोटेची काही सुरक्षात्मक वैशिष्ट्ये

  1. खरी नोट किंचित खडबडीत असते क कर्र्कर्र आवाज करते. खोटी नोट एकतर गुळगुळीत असेल किंवा दोन कागद एकमेकांत चिकटवल्यामुळे अती खडबडीत किंवा जाड असेल.
  2. खर्‍या नोटेवरील क्रमांक सहा आकडी असुन त्याआधी अक्षरांकीत सीरिज असते. क्रमांकाचा रंग लाल असतो.फक्त रो. १०००/- चे नोटेवरील क्रमांकाचे आकडे डावीकडे खाली लाल व उजवीकडे निळ्या रंगाचे आहेत. क्रमांक ultra violet lamp खाली चमकतात.
  3. खर्‍या नोटेवर महात्मा गांधी किंवा अशोक स्तंभाचा वॉटर मार्क स्पष्ट्पणे असतो. बनावट नोटात असे जलचित्र कोर्‍या जागी आणणे कठीण जाते.
  4. खर्‍या नोटेवर साधारण चंदेरी रंगाचा सुरक्षा धागा (Seciruty Thread) वरुन खाली असतो. नवीन गांधी सीरीजमध्ये हा धागा अंशतः नोटेमध्ये झाकोळलेला असतो. नोट प्रकाशाकडे धरली असता हा धागा सलग (continuous) दिसतो. या धाग्यावर R.B.I व भारत असे alternet कोरलेले असते.

एटीएम मधुन पैसे गायब ? बॅंक ग्राहकाचा हक्क !

आपण एटीएम मध्ये पैसे काढायला जातो. कार्ड अप्लाय करुन सर्व प्रक्रिया पुर्ण करतो. परंतु कधी कधी पैसे मशिन बाहेर येतच नाहित मात्र त्याचवेळी आलेल्या रिसीप्ट्मधून आपल्या खात्यातील रक्कम वजा झाल्याचे दिसुन येते. असा प्रसंग येताच हैराण न होता, आपले खाते असलेल्या बॅंकेकडे त्वरीत लेखी तक्रार नोंदवावी. तक्रारीची पोच घ्यावी. लेखी तक्रारी नंतर पाच दिवसाच्या आत वजा झालेली रक्कम आपल्या खात्यावर जमा करणे बॅंकेवर बंधनकारक आहे. जर असे झाले नाही तर सहाव्या दिवसापासुन पुढे प्रत्येक दिवसाला बॅंकेला १०० रुपये दंड होतो. शेवटी वजा रक्कम व दंड अशी एकुण रक्कम आपल्या खात्यावर जमा करणे बॅंकेला बंधनकारक आहे. तसेच या नियमाची माहीती सर्व एटीएम मध्ये दर्शनी भगावर लावणे बॅंकेवर बंधनकारक आहे



Contact Us

'Shri Bhavan'
167, B Ward, Mangalwar Peth,
Kolhapur 416 012.
Ph. : (0231) 2545552,
        2544564
        2543837,
        2547156.