Shri Mahalaxmi Co-Op Bank Ltd. Kolhapur providing Core Banking facility.

About Us

Home » About Us

सन १९०४ च्या सहकारी कायद्याने व १९१२ व १९२५ साली सहकारी क्षेत्रातील सर्व बाबींसंबंधीच्या नियमायुक्त मार्गदर्शनासाठी एक सर्वव्यापी कायदा पास करुन सरकारने सहकारी क्षेत्रास जनतेच्या कल्याणासाठी कार्य करण्यास साधन उपलब्ध करुन दिले.

कोल्हापुर शहरात १९१३ साली " अर्बन सोसायटी " ही पहिली सहकारी पतपेढी स्थापन झाली.त्यानंतर कोल्हापुर शहर व इतर खेड्यापाड्यातुन आपापल्या बांधवांच्या हितासाठी, आर्थिक मदतीसाठी पतपेढ्या स्थापन होत होत्या आणि याच तत्वावर सन १९३३ साली सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या दृष्टीने श्री. आप्पासाहेब महेकर व त्यांच्या सहकारी लोकांनी अनेक बैठका घेऊन विचारविनिमय करुन श्री महालक्ष्मी देवालयाचे नजीक " श्री महालक्ष्मी को-ऑप. सोसा. लि. " या नावाची संस्था कायद्याप्रमाणे रजिस्टर केली. ही संस्था रजिस्टर करण्यासाठी संस्थेचे संस्थापक सदस्य श्री. शंकर हणमंत कुलकर्णी-वडगांवकर यांनी विशेष प्रयत्न केले. संस्था रजिस्टर करण्यासाठी खालील पंधरा सद्गृहस्थांनी आपल्या स्वाक्ष‍र्‍या केल्या.

 1. श्री. विनायक बळवंत महेकर
 2. श्री. शंकर हणमंत कुलकर्णी-वडगांवकर
 3. श्री. बाळकृष्ण नारायण यज्ञोपवीत
 4. श्री. रामचंद्र अनंत उमराणीकर
 5. श्री. बापू कमलाकर जोशी
 6. श्री. हणमंत आण्णाजी कुलकर्णी
 7. श्री. नारायण आबाजी चिटणीस
 8. श्री. राजाराम गोविंद महेकर
 9. श्री. शंकर अनंत बेलवलकर
 10. श्री. रामचंद्र अनंत पेटकर
 11. श्री. भिमाजी विठ्ठल अत्याळकर
 12. श्री. पांडुरंग सखाराम कुलकर्णी
 13. श्री. महादेव मोरेश्वर विजापुरे
 14. श्री. अनंत गणेश जोशी
 15. श्री. सखाराम दत्तात्रय देशपांडे
संस्था नोंदविताना संस्थेचे नियोजित भांडवल रु. १००००/- हे पाच रुपयाच्या दोन हजार भागात विभागले होते. याप्रमाणे संस्था मंजुरीनंतर संस्थेची पहिली साधारण सभा दि. १०-११-१९३३ रोजी राजवैद्य यशवंतरावजी गुणे यांच्या दवाखान्यात होवुन खालीलप्रमाणे प्रथम वर्षाची कार्यकारिणी निवडण्यात आली.
 1. श्री. राजाराम गोविंद महेकर - अध्यक्ष
 2. श्री. यशवंत चिंतामण गुणे - उपाध्यक्ष
 3. श्री. रामचंद्र अनंत उमराणीकर - खजानिस
 4. श्री. विष्णु विनायक जोशी
 5. श्री. सदाशिव बळवंत दुधगांवकर वैद्य
 6. श्री. नरहर कृष्ण पंडितराव
 7. श्री. अनंत पुरुषोत्तम काळे
 8. श्री. श्रीपाद जिवाजी देशपांडे - ऑनररी सेक्रेटरी

त्या दिवशी संस्थेचे एकुण ६५ सभासद होते. कामकाज चालु झाले ते एका दिड खणाच्या जागेत व एका साध्या बैठकीवर. प्रारंभी, सकाळ व संध्याकाळ अशी कामकजाची वेळ ठेवण्यात आली आणि आज ६१ वर्षानंतरच्या सुस्थिर स्थितीकडे पाहिल्यावर प्रत्येकाला संस्थेच्या कार्याबद्दल अभिमान वाट्ल्याशिवाय राहाणार नाही.

१९४२ साली संस्थेचे बॅंकेत रुपांतर झाले आणि बॅंकेच्या प्रगतीला जोरदार सुरवात झाली. प्रगती होण्यासाठी त्यावेळचे संचालक मंडळ व सभासद सर्वांनीच हातभार लावला आहे.

कोल्हापुर शहरातील औद्योगीक वसाहतीमधील उद्योजकांना अर्थसहाय्यची असणारी गरज लक्षात घेऊन १ फेब्रुवारी १९६० मध्ये शिवाजी उद्यमनगर येथे बॅंकेची शाखा सुरु करण्यात आली. अभिमानाची गोष्ट म्हणजे त्या भागातील ही आपली पहीली बॅंक आहे.आजही आपली उद्यमनगर शाखा सभासदांचा विश्वास संपादन करुन दिमाखात सुरु आहे.२९ ऑक्टोंबर १९६२ रोजी मुख्य शाखेच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ त्यावेळचे सहकार मंत्री ना. बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते पार पडला.व ५ एप्रिल १९६४ रोजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते या नवीन इमारतीचे उद्घाटन झाले त्याचवेळी सभासदांच्या सोयीसाठी लॉकर विभाग सुरु करण्यात आला.

उद्यमनगरमध्ये शाखा सुरु करुन बॅंकेने उद्योग क्षेत्रात पदार्पण केले त्याचमाणे व्यापारी क्षेत्रात शाखा सुरु करण्याचे ठरवुन २८ फेब्रुवारी १९६६ रोजी शाहु मार्केट यार्ड येथे शाखा सुरु केली. पहिल्यांदा ही शाखा भाड्याच्या जागेत होती पण १९६९-७० मध्ये ती जागा शाखेने खरेदी केली. ज्याप्रमणे बॅंकेची प्रगती होत होती त्याच्प्रमाणे सभासदही वाढत होते.१९६९-७० च्या वेळी सभासद संख्या ७००० चे पेक्षा जास्त होती आणि कोल्हापुर जिल्हा सहकारी बोर्डाच्या बॅंकींग स्पर्धेत आपल्या बॅंकेने दुसरा क्रमांक मिळवला.

उद्यमनगर व मार्केट यार्ड या शाखांना मिळणारा प्रतिसाद पाहुन बॅंकेने व्यापारी क्षेत्रातील जास्तीत जास्त लोकांना मदत न मार्गदर्शन मिळावे या दृष्टीने शाहुपुरी येथे शाखा सुरु केली ती शाखाही जोरदारपणे प्रगति करत आहे.याचा विचार करुन बॅंकेच्या संचालकांनी वाढत्या कोल्हापुर शहराचा अभ्यास करुन ताराबाई पार्क येथेही शाखा स्थापन केली.सर्व शाखांना मिळणारा वाढता प्रतिसाद व औद्योगीक जगतातील उद्योजकांच्या अडचणी यांची गरज लक्ष्यात घेऊन गोकुळ शिरगाव येथेही शाखा सुरु करण्यात आली आहे.

आज अभिमानाने नमुद करण्यासारखी गोष्ट म्हणजे बॅंकेच्या सर्व शाखा ह्या स्वताःच्या वास्तुमध्ये कार्यरत असुन गोकुळ शिरगाव शाखाही लवकरच स्वताःच्या वास्तुमध्ये स्थलांतरीत होत आहे. हीरक महोत्सवी वर्षात आपल्या बॅंकेने आधुनिकीकरणाचे पाऊल म्हणुन रिझर्व बॅंकेच्या परिपत्रकास अनुसरुन बॅंकेची मुख्य शाखा " ऑनलाईन कॉम्पुटरायझेशन " करुन कोल्हापुर जिल्ह्यातील पहिलि कॉम्पुटराईज नागरी सहकारी बॅंक होण्याचा मान मिळवला आहे. त्याच प्रमाणे सभासदांना व खातेदारांना तत्पर सेवा मिळण्याच्या दृष्टीने सर्व शाखांमध्ये लवकरच संगणक बसविण्यात य़ेणार आहेत.

आपल्या बॅंकेची जी जोरदार प्रगति सुरु आहे त्यामागे संस्थेचे हीत पाहणारे, दुरदृष्टी असणारे संचालक मंडळ यांचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या बॅंकेने पुढील कालाची पावले ओळखुन योग्य त्या तरतुदी ज्या-त्या वेळी केल्या असल्याने आज रिझर्व बॅंकेच्या उत्पन्न संल्कपना व एन पी ए या धोरणानुसार नफा काढुनही आपल्या बॅंकेने ४० लाखापेक्षाही जास्त नफा कमावला आहे.

१९८० सालानंतरची बॅंकेची जी प्रगति झाली ती सर्वांना समजण्यासाठी आलेख पहावेत त्यावरुन लक्ष्यात येते की बॅंकेच्या ठेवी, भाग- भांडवल, कर्ज, नफा, खेळते भांडवल, यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे आणि बॅंकेची अशी प्रगति होण्याचे कारण म्हणजे आपल्याला लाभलेले उच्चशिक्षीत संचालक मंडळ हे आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली बॅंकेची प्रगति अशीच जोरदार चालु राहिली तर नफ्याच्या बाबतीत आपली बॅंक लवकरच नं. १ ला पोहचेल.

आज आपल्या जिल्ह्यात सभासदांची गरज ओळखुन योग्य ती पुर्तता केल्यावर विनातारण रु. २५०००/- पर्यंत कर्ज देणारी फक्त आपलीच बॅंक आहे. बॅंकेची प्रगति होण्यासाठी कर्ज घेण्याप्रमाणे परतफेडही वेळेत होणे जरुरीचे असते तेव्हा कर्जदारांनी आपली जवाबदारी ऒळखुन कर्जाची परतफेड वेळेत करुन बॅंकेच्या प्रगतिला हातभार लावावा.

१९३३ साली लावलेल्या रोपट्याचा आज एक वटवृक्ष झाला आहे त्या वटवृक्षाच्या सावलीत आज २७००० पेक्षा जास्त सभासद समाधानात आपली प्रगती करुन घेत आहेत व बॅंकेची प्रगति करीत आहेत

हीरक महोत्सवी वर्षानिमित्त बॅंकेच्या प्रगतिचा अहवाल देताना हि संस्था, या प्रसंगी बॅंकेचे सर्व भागीदार, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक तसेच सहकरी खाते या सर्वांची विविध प्रकारची मदत बॅंकेला प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या लाभली आहे. त्या सर्वांचे कृतज्ञतापुर्वक आभार प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष मानत आहे.तसेच संस्थेचा विकास होण्यासाठी, सभासदांना, खातेदारांना तत्पर सेवा देण्यासाठी व संगणकीकरण करत असताना, कर्मचार्‍यांनी अहोरात्र कष्ट घेतले आहेत. तसेच सर्व संचालकांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांनाही धन्यवाद देणे जरुरीचे आहे.

Contact Us

'Shri Bhavan'
167, B Ward, Mangalwar Peth,
Kolhapur 416 012.
Ph. : (0231) 2545552,
        2544564
        2543837,
        2547156.